अंबरनाथ शहरातील विविध नागरी समस्यांबाबत मनसेने अंबरनाथ नगरपालिकेवर मोर्चा काढला

 


मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.यानंतर अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेत त्यांना या समस्यांचा जाब विचारण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर अंतरात फेरीवाले नको,अशी मागणी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तसेच पालिकेने १५ दिवसात फेरीवाले न हटवल्यास १६ वा दिवस आमचा असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिला.

या वेळी अंबरनाथ शहरातील  मनसे चे मा.नगरसेवक,उपशहर अध्यक्ष,विभाग अध्यक्ष असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post